Ticker

6/recent/ticker-posts

तालुका महिला भा.ज.पा.अध्यक्ष सायलीताई जितेंद्र बोत्रे यांनी आदिवासी ,ठाकर पाड्यावर जाऊन केले मास्क चे वाटप

मावळ : कोरोणा विषाणू या महामारी मुळे मावळ तालुक्यातील आदिवासी,ठाकर पाड्यावर जाऊन नागरीकांना सुरक्षेतेसाठी भाजपा महिला आघाडी अध्यक्षा सायलीताई जितेंद्र बोत्रे यांच्या वतीने ३००० मास्क चे नागरीकांना वाटप करण्यात आले.  
          तसेच मावळ पंचायत समितीच्या सभागृहांमध्ये तालुक्यातील आरोग्य कर्मचारी डॉक्टर नर्स अंगणवाडी सेविका आशा वर्कर तसेच प्रशासकीय कर्मचारी यांच्याकरिता ५०० मास्क तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर लोहरे गट विकास अधिकारी शरचंद्र माळी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
            मास्क वाटप करता वेळी मधे माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे ,भाजपा जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे ,सभापती निकिता ताई घोटकुले ,तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे ,युवा अध्यक्ष संदीप काकडे ,प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे,जि.प.सदस्य नितीन मराठे ,देहूरोड कॅन्टोन्मेंट उपाध्यक्ष रघुवीर शेलार,पं.स. सदस्य गुलाबराव म्हाळसकर , शांताराम कदम ,ज्योती शिंदे सुमित्रा जाधव ,ज्योती काटकर देहूरोड शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार ,मा.जि.प. सदस्य मिलिंद बोत्रे ,एकनाथ गायकवाड ,प्रदीप हुलावळे ,सचिन येवले मंगेश देशमुख आदी सह पदाधिकारी आणि कार्यकरते उपस्थित होते.
-------------------------------
आपल्या भागातील बातम्यासाठी संपर्क करा..
वसुंधरा न्युज मावळ
समीर भोसले,पत्रकार मो.नं.८४८२९६९६४४
----------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या