मावळ : करोणा विषाणू या महामारी मुळे संपुर्ण जगात थैमान घातले आहे. अशा परिस्थितीमध्ये पोलीस, डॉक्टर, आरोग्य सेवक,आशा सेविका,तहसिलदार,तलाठी,नगरसेवक,शासकीय कर्मचारी,सरपंच,उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य,पोलिस पाटील आणि स्थानिक प्रतिनिधी हे अहोरात्र नागरीकांना अत्यावश्यक सेवा पुरवत आहे,काही संस्था गरजुंना कोणी उपाशी राहू नये म्हणुन अन्न पुरवत आहे. या राजकीय व सामाजिक महिला भगीनीमधे मधे नाव घ्यावेसे वाटते ते मावळ तालुक्यातील लोणावळा शहरातील विद्यमान नगरसेविका सौ. ब्रिदाताई गणात्रा यांच ..
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच बजरंगदल या संस्थेच्या माध्यमातून . लोणावळा परिसरातील आदिवासी वाडी वस्त्यावर गरजू बांधवांना जीवनाअवश्यक वस्तूंचे वाटप करत आहे.
सुरक्षा चे बाबत दक्षता घेण्यासाठी ताईंनी स्वता घरी कापडी मास्क बनवून नागरीकांना वाड्या वस्त्यांवर जाऊन वितरित करत आहे.
कोरोना विषाणूंमुळे पडलेल्या टाळेबंदमध्ये माणसाप्रमाणे पशु-पक्षानां ही झळ बसली आहे. पशू-पक्षी,प्राण्यांचेही अन्नपाण्याशिवाय हाल होतं आहे. ब्रिदाताई पशुप्राण्यांना अन्नपाणी देण्यासाठी प्रत्यक्ष स्वाताः जाऊन अन्न पाणी देतात त्यांची काळजी घेताना दिसतात.
नारीशक्ती ..बिंद्राताई गणात्रा अशी एक ना अनेक सामाजिक कार्य ताई करत असतात आशा कार्याला मावळ तालुक्यातील जणतेचा तुम्हाला सलाम.
" मला सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानते." - बिंद्राताई गणात्रा
पुढील भागात मावळातील नविन कार्यशिल प्रतिनिधी यांची कामगिरी पाहणार आहोत...लवकरच ...
--------------------------
वसुंधरा न्युज मावळ
शब्दांकन-समीर भोसले मो.नं.८४८२९६९६४४
0 टिप्पण्या