Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य व बेजबाबदार कामगिरीच्या विरोधात मावळ भाजपा वतीने मावळ तहसीलदार यांना निवेदन

वडगाव मावळ - राज्याची परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली आहे लोकं ऐकत नाहीत पोलीस दलातील अनेक ऑफिसर ना कोरोना ची लागण झाली आहे हॉस्पिटल मध्ये काम करणारे फ्रंट लाईन योद्धे यांना आता कोरोना ची लागण होते आहे रेड झोन मध्ये CAPF आणायला उशीर केला , अनेक खाजगी हॉस्पिटल मध्ये पेशंट ना दाखल करण्यात येत नाहीये, आणि केले तरी लाखांनी बिल येत आहे विरोधी पक्षनेत्यांनी काही सूचना केल्या की त्याला पद्धतशीर पणे ट्रोल केले जाते आज महाराष्ट्रात कोरोणा विषाणू वाढत आहे सगळा देश लॉक डाऊन मधून बाहेर पडून नवी झेप घेऊ पाहतोय, पण माझा महाराष्ट्र रेड झोन मध्ये बांधला गेलाय, याला जबाबदार कोण?
आशा विविध विषयावर प्रशासन बेजबाबदार वागत आहे.
           मंत्री आणि प्रशासनात असलेला समन्वयाचा अभाव या निषेधार्थ मावळ भाजपाच्या वतीने मावळ तहसीलदार श्री. मधुसूदन बर्गे यांच्याकडे निवेदन देऊन, राज्य शासनाचा निषेध करण्यात आला याप्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष रविंद्र(आप्पा)भेगडे,जि.प.सदस्य नितीन मराठे,मावळ पं. समिती सभापती निकिताताई घोटकुले ,उपसभापती दत्ताभाऊ शेवाळे,भाजप प्रदेश युवा मोर्च्या सचिव जितेंद्र बोत्रे,मावळ युवा मोर्च्या अध्यक्ष संदीप काकडे,महिला आघाडी अध्यक्षा सायलीताई बोत्रे,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, तळेगाव भाजप अध्यक्ष रविजी माने ,संघटन मंत्री किरण राक्षे,वडगाव शहर अध्यक्ष किरण भिलारे,,दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंभोरे,व भाजपचे पदाधिकारी 
 उपस्थित होते.

---------------------

वसुंधरा न्युज मावळ
मो.नं.८४८२९६९६४४
----------------------
--------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या