Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य व बेजबाबदार कामगिरीच्या विरोधात मावळ तळेगाव शहर भाजपा वतीने तहसीलदार यांना निवेदन

वडगाव मावळ : अवघा देश कोरोना संकटाविरुद्ध एकजुटीने लढत असताना पीपीई किट,कोविड हॉस्पिटल निर्मिती,वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांची मदत घेऊन निश्चित व प्रभावी योजना करण्यातील नियोजनशून्यतेमुळे महाराष्ट्रातील नाकर्त्या राज्यकर्त्यांमुळे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण,सर्वाधिक मृत्यूदर,यामुळे Covid 19 या महारोगावर उपाययोजना करण्यात महाविकास आघाडी च्या नेतृत्वाखालील सरकार सपशेल अपयशी ठरले आहे.

                परप्रांतीय व महाराष्ट्रातील स्थलांतरितांसाठी योग्य साधन सुविधा उभी करण्यात,सातत्याने बदलणारे निर्णय,केंद्र सरकारशी समन्वयाचा अभाव यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळले जात आहे.
केंद्र सरकारची भरघोस मदत असतानाही परिस्थिती हाताळण्यात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे नेतृत्व अपयशी ठरले आहे.
या भीषण संकटातसुद्धा स्वतःच्या आमदारकीची आणि मतपेटीची काळजी घेण्यात सरकार इतके आंधळे झाले आहे की पोलीसांवर दिवसेंदिवस वाढत चाललेले हल्ले त्यांना दिसेनासे झाले आहे.

              कोरोना संकटातील लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक घडी विस्कटली असून या सर्वसामान्य नागरिकांना यातून सावरण्यासाठी राज्य सरकारणे विशेष आर्थिक पॕकेज घोषित करावे साठी भाजपा महाराष्ट्र प्रदेश भाजपा आणि मा.राज्यमंत्री श्री.संजय (बाळा) भेगडे व  जिल्हाध्यक्ष श्री.गणेशतात्या भेगडे यांच्या सूचनेनुसार सोशल डिस्टसिंग ची काळजी घेत भारतीय जनता पार्टी-तळेगाव दाभाडे शहराच्यावतीने वडगाव मावळचे तहसीलदार मा.मधुसुदनजी बर्गे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने,कार्याध्यक्ष महेंद्र रामचंद्र पळसे,जि.प.सदस्य नितीनभाऊ मराठे,संघटनमंत्री सचिनभाऊ  टकले,सरचिटणीस विनायक गंगाराम भेगडे,रवि अशोक  साबळे,प्रदिप ज्ञानेश्वर गटे,रविंद्र जनार्दन भोसले,हे उपस्थित होते.

---------------------

वसुंधरा न्युज मावळ
मो.नं.८४८२९६९६४४
----------------------
--------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या