मावळ : देशावर आलेल्या कोरोना विषाणू संकटावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला.या लॉकडाऊनमुळे बरेच काही शिकायला मिळालं. या लोकडाऊनचा वेळ असाच वाया न घालवता आपल्या गावांसाठी काही तरी करता येईल या कल्पनेने काही तरुण एकत्र येतात आणि गावात श्रमदान करतात.त्याच्या श्रमदानातून विधायक कार्य घडते.
मावळ तालुक्यातील आई एकविरा देवीच्या पायथ्याशी वसलेले दहिवली हे गाव..या गावातील तरुण एकत्र येतात आणि सलग पंधरा दिवस श्रमदान करतात.सुरुवातीचे पाच दिवस गावातील डोंगरातील पाणवठे साफ करतात. त्यानंतर *माझे घर,माझ्या घराचा परिसर* स्वच्छता मोहीम राबवून गावचा संपूर्ण परिसर कचरामुक्त करण्याचा प्रयत्न करतात.
कोरोनामुळे गावच्या ओढ्यावरील पुलाच्या कठडाचे काम अर्धवट राहिल्याने कोणी लहान मुले खेळत असताना अपघात घडू नये म्हणून लाकडी बांबूचा तात्पुरता भक्कम कठडा बांधतात. कठड्याचे काम चालू असताना या युवकांना पुलाखाली सांडपाणी साचून राहतं हे निर्देशनास येतें मग काय त्या पाण्याला प्रवाह देण्याचं काम सुरू होतं आणि त्या पुलाखालील असलेलं पाण्याला अडथळा निर्माण झालेला सिमेंट कौक्रीट ब्रेकरच्या साहाय्याने फोडुन कार्य फत्ते करतात.
ह्या मोहिमेत फक्त तरुणच नव्हे तर लहान मुले ही सहभागी होतात.गावातील डोंगरातील शिकारीसाठी लावलेले सापळे काढून टाकतात. आणि वनतोड, प्राण्यांच्या शिकारी होऊ नये म्हणून हे चिमुकल्या मुलांनी स्वतांनी बनवलेले माहिती फलक तयार करून लावतात.
"आम्ही सर्वं तरुणांनी एकत्र येऊन सर्वांना दाखवून दिले आहे की गावातील तरुण एकत्र येऊन गावच्या,राज्याच्या,देशाच्या विकासासाठी योगदान देऊ शकतो." - सागर येवले ,दहिवली
युवा शक्ती परिवर्तन शक्ती
----------------------------------------------
0 टिप्पण्या