Ticker

6/recent/ticker-posts

मा. कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून लाँकडाऊन मधे अडकलेले कामगार वाशिम कडे रवाना

   मावळ :  देशावर आलेल्या कोरोना विषाणू च्या साथीच्या रोगामुळे कामगार हवालदिल झाला आहे. काम नसल्या मुळे कामगारांना सुखरुप घरी जाण्यासाठी भारतीय जनता पार्टी मावळ तालुका व मा.कामगार राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यात अडकलेल्या मजुरांना वाशीम येथे आपल्या घराकडे जाण्यासाठी वाट मोकळी करून देण्यात आली

            यामध्ये सर्व मजुरांची वैद्यकीय तपासणी पूर्ण करून त्याचबरोबर त्यांना प्रवासात जेवणाचे पॅकेट,पाणी,मास्क चे वाटप करून मा.तहसीलदार मधुसूदन बर्गे,तालुकाध्यक्ष रवींद्रपअप्पा भेगडे,जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे,अलकाताई धानीवले, युवाध्यक्ष संदीप काकडे,अर्जुन पाठारे, सरचिटणीस सुनिल चव्हाण, संघटनमंत्री किरण राक्षे,सायलीताई बोत्रे,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे ,आनंता कुडे,किरण भिलारे, क्रीडा आघाडी अध्यक्ष नामदेव वारींगे, वडगाव विद्यार्थी अध्यक्ष विकी म्हाळस्कर आदी लोकप्रतिनिधी,प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थित सर्व मजुरांना घराकडे रवाना करण्यात आले.

 मावळ तालुक्यात अजुनही जे कामगार लाँकडाऊन मधे अडकलेले आहेत.त्यांनी भाजपा कार्यकर्यांशी संपर्क  करावा - संजय तथा बाळा भेगडे ,मा.मंत्री महाराष्ट्रराज्य 

------------------------------

आपल्या भागातील बातम्यासाठी संपर्क करा..
वसुंधरा न्युज मावळ
समीर भोसले,पत्रकार मो.नं.८४८२९६९६४४
----------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या