मावळ : मावळ तालुक्यातील निगडे गावातील युवा उद्योजक श्री.संजय भांगरे यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून निगडे गावात २०० कुटुंबांना मोफत मास्क वाटप केले. केंद्र शासन आणि राज्य सरकार कोरोना या विषाणूशी बचाव करण्यासाठी खूप चांगले प्रयत्न करत आहे. अशाच संकट समयी आपणही या समाजाचे एक घटक म्हणुन या समाजासाठी काहीतरी देणं लागतो, हा उद्देश मनाशी बाळगून संजय भांगरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने निगडे गावातील २०० कुटुंबांना मास्क व खाऊ वाटप केला. प्रत्येक अडचणीच्या काळात अशाप्रकारे खारीचा वाटा म्हणून संजय भांगरे व मित्रपरीवार सहकार्य करीत राहील अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.
हे मास्क वाटताना सहकार्यांनी सोशल डिस्टंस व कोरोना बाबत जनजागृती करत ग्रामस्थांना घरी राहुया कोरोनाला हरवुया असे आवाहन केले.
--------------------------------------------------
0 टिप्पण्या