करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि.९ आणि १० तारखेला संपुर्ण कामशेत बाजारपेठ ,पाजीपाला मंडई बंद ठेवण्याचा निर्णय झाला .परिसरातील नागरिकांनी ,व्यापारी,भाजीमंडई. इ.सर्व दुकाने बंद राहणार आहे .या बंद मधुन मेडिकल व हाॅस्पिटल यांना वगळण्यात आले आहे असे सरपंच रुपालीताई शिंनगारे यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर कोणीही घराच्या बाहेर फिरु नये जर कोणी नियमांचे उल्लंघन केल्यास अढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने पुढील काही दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. कृपया शासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना पाळा.सार्वजनिक कार्यक्रम, गर्दीची ठिकाणे टाळा, स्वच्छता राखा, आपले हात सतत स्वच्छ ठेवा, शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड, रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका. ताप असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल आणि खोकला असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा हि नम्र विनंती !.
0 टिप्पण्या