Ticker

6/recent/ticker-posts

तळेगाव दाभाडे - भारतीय जनता पार्टी तळेगांव दाभाडे शहर वतीने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची नागरीकांना माहीती देण्यात आली.


हा उपक्रम  शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने,कार्याध्यक्ष महेंद्र रामचंद्र पळसे,खजिनदार सतिष(बाप्पू )राऊत,सरचिटणीस विनायक गंगाराम भेगडे,यांच्यासह तळेगाव दाभाडे शहरातील स्वस्त धान्य दुकानांना भेट देऊन नागरिकांना येणाऱ्या अडचणी यासंदर्भात दुकानदार आणि नागरिकांशी चर्चा केली.सर्व ग्राहकांना सहकार्य करण्यास सांगितले.

आत्ता पहिल्या टप्प्यात प्राधान्य ग्राहकांना आपल्या नियमित धान्यासह कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान गरीब कल्याण अन्न्न योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीमागे ५ कि.तांदूळ मिळणार आहे.केशरी कार्ड धारकांना मे व जून मध्ये धान्य मिळणार आहे.तळेगाव दाभाडे शहरातील सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील स्वस्त धान्य दुकानांना भेट देऊन नागरिकांना सहकार्य करावे .असे अवाहन करण्यात आले

            कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने पुढील काही दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. कृपया शासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना पाळा.सार्वजनिक कार्यक्रम, गर्दीची ठिकाणे टाळा, स्वच्छता राखा, आपले हात सतत स्वच्छ ठेवा, शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड, रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका. ताप असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल आणि खोकला असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा हि नम्र विनंती !.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या