पदवीधर मतदार नोंदणी नव्याने चालु झाली असुन मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पदवीधर मतदारसंघाची जुनी मतदारयादी (सन २०१४ च्या निवडणुकीपर्यंत अस्तित्वात असलेली) रद्द करण्यात आल्यामुळे पात्र पदवी/पदविकाधारकांनी मतदारयादीत नव्याने नावनोंदणी करणे गरजेचे आहे.
या करीता पुणे विभागात पदवीधर नागरीकांनी आपले नाव नव्याने नोंदवले गेले पाहिजे असे अवाहन वडगाव येथे झालेल्या बैठकीत भाजपा तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी केले. या बाबत कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक विभागांमध्ये केंद्र सुरु करण्यात येणार असून नागरिकांनी त्या केंद्रावरची आपली नाव नोंदणी करावी.या वेळी तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संदिप काकडे,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे,अर्जुन पठारे,तळेगाव युवा अध्यक्ष अक्षय भेगडे ,कल्पेश भोंडवे, समिर भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते
मोबाईलवरून ऑनलाईन नोंदणी करण्यापुर्वी *पासपोर्ट साईज फोटो,पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र,पत्ता पुरावा,विवाह प्रमाणपत्र(महिलांसाठी)* इत्यादी कागदपत्रे मोबाईलमध्ये स्कॅन करून घ्यावीत.
https://ceo.maharashtra.gov.in/gonline/graduate19.aspx
https://ceo.maharashtra.gov.in/gonline/graduate19.aspx
या लिंकवर क्लिक करुन पदवी/पदविका धारक यांना नव्याने मतदारनोंदणी करता येईल.
0 टिप्पण्या