या वेळी त्यांनी माध्यमांशी बोलतानी विद्यार्थ्यांवरती होणाऱ्या अन्यायाचा जाहिर निषेध नोंदविला.तसेच मावळ तालुक्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये महाविद्यालयीन तरुणींच्या सुरक्षिततेसाठी आठवड्यातून एकदा तरी पोलीसांनी भरारी पथकाद्वारे महाविद्यालयात पाहणी करावी व संबंधित रोडरोमियोंवर कारवाई करण्यात यावी या साठी सर्व पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देणार असल्याचे जाहिर केले.
मावळ तालुक्यात लवकरच तरुण महाविद्यालयीन विद्यार्थींनीसाठी शिक्षण व समुपदेशनाच्या दृष्टिकोनातून "ताई,मला तुला काही तरी सांगायचय" ह्या विषयाचे जाहीर व्याख्यान आयोजित करणार असल्याचे माहिती माध्यमांना दिली.
खेडेगावातील महाविद्यालयीन मुला-मुलींना बस व रेल्वेच्या पास मध्ये सवलत मिळावीयासाठी एसटी आगार व रेल्वे स्टेशनच्या अधिकाऱ्यांना निवदेन देणार असल्याची माहिती दिली.
लवकरच विद्यार्थ्यांचे प्रश्न सरकारच्या दरबारात मांडण्यासाठी,प्रदेशाध्यक्ष चंद्रकातदादा पाटील व जिल्ह्यातील सर्व मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले.
माध्यमांबरोबर बोलताना चव्हाण यांनी "विद्यार्थी चळवळ मोडीत काढणार असाल तर त्या विरोधात संघर्ष करु असे जाहिर केले".
"विद्यार्थी वर्गाच्या हिताचे जे काही निर्णय असेल त्याकडे लक्ष वेधू"-:अभिमन्यू शिंदे(तालुकाध्यक्ष भाजपा विद्यार्थी आघाडी)
0 टिप्पण्या