आज ५८ वा गोवा मुक्ती दिवस आहे.
गोवा मुक्ती संग्रामात अनेकांनी स्वतंत्र आणी अखंड भारतासाठी प्राण पणाला लावले होते..
शेकडो स्वयंसेवक यात सहभागी झाले होते. अनेकांना आयुष्यभराच्या शारिरीक व सामाजिक जखमा झाल्या. पण स्वातंत्र्यानंतर हा एकच परकीय अंमल असणारा भाग सर्वांना जाचत होता. त्यामुळे हा प्रदेश सुद्धा स्वतंत्र करण्यासाठी प्राण पणाला लावून सर्वांनी प्रयत्न केला.
आणी त्यात ते सारे यशस्वी झाले.
पूजनीय नथुभाऊंच्या नेतृत्वात आपल्या मावळातुन बिन्निच्या शिलेदारांची एक तुकडी गोव्याच्या यशस्वी मुक्तीसाठी झेपावली होती....
पूजनीय नथुभाऊंनी सर्व सहकारी बंधूंना गोवा मुक्ती स्वातंत्र्य संग्रामाकरिता केलेले आर्त आवाहन :
" जे देशाच्या पूर्ण स्वातंत्र्या करिता मरण पत्करण्यास सिद्ध आहेत त्या सर्वांनी सोबत चला, आपली मातृभूमी आपल्याला बोलावते आहे "
श्री शिवछत्रपती, शंभू महाराजांचे मावळेच ते सारे...
अनेक जमले, गोमन्तकात गेले, आणी विजयश्री घेउनच आले.
तन समर्पित, मन समर्पित,
और यह जीवन समर्पित,
चाहता हूँ हे मातृभू,
तुझे कुछ और भी दूं ।।
वंदे मातरम्
0 टिप्पण्या