Ticker

6/recent/ticker-posts

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कामशेत मध्ये शिवस्मारकाचं उद्घाटन....


   कामशेत -  कामशेत शहराचं वैभव अधिकच वाढणार आहे, ग्रामीण, शहरी भागातील सर्व शिवभक्तांच्या मनातील इच्छा आता पूर्ण होणार. ज्यावेळी कामशेत मध्ये ग्रामीण भागातील व शहरातील शिवभक्त  येतात तेव्हा कामशेतच्या मध्यभागी असणारा चौक भकास वाटल्यासारखा वाटतो येथे शिवस्मारक व्हावे असे प्रत्येकाला वाटल्याशिवाय राहत नव्हते ,प्रत्येकाला वाटत होते येथे माझ्या राजाचा भव्य शिव पुतळा असायला हवा होता, आता सर्वांची इच्छा पूर्ण होणार आहे. 

येत्या 6 जूनला शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कामशेत मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दि. 6/6/2025 रोजी सकाळी 9 वाजता  छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा होण्याकरिता भूमिपूजन सोहळा कार्यक्रम होणार आहे.
 कार्यक्रम..
▪️ सकाळी 9 वाजता महाराजांचा दुग्ध अभिषेक..
▪️ सकाळी 10 वाजता शिवस्मारक भूमिपूजन..
▪️ सकाळी 11 वाजता शिव वंदना 

 संपूर्ण शिवस्मारकाचे अंदाजे दीड कोटी रुपयांचे बजेट आहे, हे सर्व लोक वर्गणीतून गोळा केले जाणार आहे.
 
या कार्यक्रमासाठी मावळ तालुक्यातील सर्व शिवभक्तांनी आपल्या कुटुंबासह उपस्थित रहावे असे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती वतीने आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या