मावळ दि १ - माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा वाढदिवस दि.३१ रोजी पार पडला २०१९ नंतर पहिल्यांदाच मा.राज्यमंत्री बाळा भेगडे हे वाढदिवसा निमित्त गावोगावी पोहचले लोणावळा, वराळे,तळेगाव ,देहूरोड, वडगाव, कामशेत, देहू अशा इतर शहरात होम मिनिस्टर, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर,शासन आपल्या द्वारी,कुस्ती, बैलगाडा शर्यत,चित्रकला,निबंध स्पर्धा व संकृतीक कार्यक्रम मावळ तालुक्यात वाढदिवसानिमित्त घेण्यात आले. सर्वत्र हजारोच्या संख्येत नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला भाजपाचे कार्यकर्ते ही उत्साहात होते.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम चालू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन द्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ते देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू मानले जातात. मावळ लोकसभा मधे भाजपाचे पनवेल मधे रामशेत ठाकुर व,चिंचवड या ठिकाणी अश्विनी जगताप असे भाजपाचे विद्यमान आमदार आहेत ,कर्जत मधे माजी आमदार सुरेश लाड यांनी काही दिवसांपूर्वी भाजप मधे प्रवेश केला त्यातच भाजपाची मावळ लोकसभा मधे ताकद वाढली आहे त्या मुळे भाजपा वरीष्ठ पातळीवर मावळ लोकसभाची मतदार संघ भाजपाला मिळावा या साठी मागणी होऊ शकते. युती मधील जागा वाटपानंतर ठरेल मावळ लोकसभा खासदार कोन? बाळा भेगडे की विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हॅट्रिक करणार.
या वाढदिवसात सर्वात जास्त चर्चा झाली ती भावी खासदार मावळ तालुक्यात प्रत्येक गावागावात भावी खासदार अशा शुभेच्छा सोशल मीडिया, फ्लेक्स वरती देण्यात आल्या बाळा भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कार्यकर्तेही ॲक्शन मोडमध्ये दिसू लागले या वर्षी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी इतर पक्षातील नेते मंडळींनी हजेरी लावली हे विषेश परंतु मा.राज्यमंत्री बाळा भेगडे हे विधानसभा लढणार की लोकसभा हे गुलदस्त्यात आहे .
माननीय बाळाभाऊ भेगडे यांना आम्ही सर्वांनी शुभेच्छा दिल्या. यावर्षी त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली असून सकाळपासून संध्याकाळपर्यंत शुभेच्छा देण्यासाठी मोठी रांग लागली होती.
गेली 8 दिवस त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या पदाधिकाऱ्यांनी लोकहिताचे अनेक उपक्रम राबवले.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील हे उत्साहाचे वातावरण बरेच काही सांगून जाते.
- श्री. शरदभाऊ बुट्टे पाटील
जिल्हाध्यक्ष : भारतीय जनता पार्टी पुणे ग्रामीण