वडगाव - ग्रामपंचायत निवडणुक निकालामध्ये मावळ तालुक्यातील दहा ग्रामपंचायत मध्ये भारतीय जनता पार्टीचे सरपंच पदाचे उमेदवार व सदस्य भरघोस मतांनी विजयी झाले यावेळी विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचा पक्ष कार्यालयात मा.राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे ,निवडणूक प्रमुख रविंद्रआप्पा भेगडे , तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ गुंड यांच्या हस्ते हार, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..!
भाजपा नवनिर्वाचित सरपंच..
१) साळूब्रे - विशाल शामराव राक्षे २) आढले बुद्रुक - सुवर्णा बाळासाहेब घोटकुले ३)ओव्हळे - दिलीप ज्ञानेश्वर शिंदे ४)डोणे - ऋषिकेश कोंडीबा कारके ५)लोहगड - सोनाली प्रमोद बैकर ६) आंबळे - आशा संपत कदम ७)उदेवाडी - नेहा अक्षय उंबरे ८) शिळींब - सिद्धार्थ चंद्रकांत कडू ९) जांभवडे - तानाजी बंडू नाटक १०)पुसाणे - अमोल ज्ञानेश्वर वाजे...तसेच इतर ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा थोड्याफार मतांनी पराभव झाला अशा सर्व कार्यकर्त्यांना धीर दिला व आगामी काळात अधिक जोमाने लढूया व जिंकूया आम्ही सर्वजण आपल्या सोबत असल्याचा शब्द दिला..!
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रामदास गाडे, मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर , मा. उपसभापती ,शांतारामबापू कदम , कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष किरणभाऊ राक्षे आदिंसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.!
0 टिप्पण्या