मावळ दि - टाकवे बु" येथे भारतीय जनता पार्टी टाकवे वडेश्र्वर गटातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा जिल्हाध्यक्ष शरद भाऊ बूट्टे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित केला होता या मेळाव्यामध्ये जिल्हाध्यक्ष यांनी कार्यकर्ते यांना संबोधित करताना म्हणाले कि " मागील पराभव विसरून कार्यकर्त्यांनी पुन्हा जोमाने कामाला लागा...मावळ लोकसभा ,विधानसभा पुन्हा आणण्याचा निर्धार या वेळी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी व्यक्त केला. तसेच सावळा ग्रामपंचायत चे मा.सरपंच नामदेव गोणते व त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी त्यांच्यासह आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत केले..!
यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद करून बूथ सशक्तीकरण अभियान अंतर्गत बूथ स्तरावर करावयाच्या संघटनात्मक कार्यासंदर्भात महत्त्वाचं मार्गदर्शन केले.
त्याचसोबत बूथ स्तरावर जनता व्हाट्सअप ग्रुप , बूथ कमिटी व्हाट्सअप ग्रुप , सरल ॲप डाऊनलोड करणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे इ.सह कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना जिल्हाध्यक्ष शरद बूट्टे पाटील यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे, मावळ भाजपा प्रभारी भास्कर आप्पा म्हाळसकर , जेष्ठ नेते ज्ञानेश्वर दळवी , मा.सभापती गुलाब काका म्हाळसकर, मा.उपसभापती शांताराम बापू कदम,प्रदेश सांकृतिक संघटक वेदांग महाजन, मावळ विधानसभा संयोजक रामदास गाडे, यदुनाथ चोरघे,महिला आघाडी अध्यक्षा सायलीताई बोत्रे,कल्याणीताई ठाकर , विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे,कामगार आघाडी अध्यक्ष अमोल भाऊ भेगडे, मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नामदेव कोंडे, मा.सभापती गणेश गायकवाड, किरण राक्षे,युवा नेते गणेश क्ल्हाटकर, गटाचे अध्यक्ष रोहिदास असवले, युवा नेते रवि शेटे, युवा नेते विजय टाकवे, युवा नेते पुंडलिक खांडभोर,गण अध्यक्ष अरुण कूटे, अमोल भोईरकर,शक्ती केंद्र प्रमुख विशाल भांगरे,सचिन पांगारे , इंदाराम उंडे,सरपंच लक्ष्मण तळावडे ,सुरेश आलम, रामदास आलम, सतीश सावंत, आदी सह गटातील सर्व शक्ती केंद्र प्रमुख,बूथ अध्यक्ष आणि पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी सह मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या