Ticker

6/recent/ticker-posts

मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या गोवित्री ग्रामपंचायतीमधील विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न...


मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या गोवित्री ग्रामपंचायतीमधील विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न...
मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून  ग्रामपंचायत गोवित्री अंतर्गत वळवंती, कोळवाडी, भाजगाव येथील मंजूर झालेल्या 50.00 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ खासदार श्रीरंगअप्पा बारणे यांचे हस्ते दि.02/06/2023 रोजी संपन्न झाला. यावेळी कात्रज दूध उत्पादक संघाचे  संचालक श्री.बाळासाहेब नेवाळे, मा.सभापती श्री.गुलाबकाका म्हाळसकर, शिवसेना तालुकाध्यक्ष श्री.राजूभाऊ खांडभोर, जि.नि.समिती सदस्य श्री.शरद हुलावळे, मा.जि.प.सदस्य श्री.शेखर भोसले, मा.सभापती श्री.दत्तात्रय शेवाळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य श्री.नामदेव कोंडे, मा.सरपंच गणपतदादा सावंत, पुणे जिल्हा युवासेना प्रमुख श्री.गिरीश सातकर, मावळ युवासेना प्रमुख विशाल हुलावळे, अरुण कुटे, प्रवीण ढोरे, नितीन देशमुख, राहुल मुन्ना मोरे,अमोल भेगडे, दत्तात्रय खेंगले, विशाल भांगरे, शशिकांत ठाकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच भारतीय जनता पार्टी, शिवसेना युतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे स्वागत सरपंच श्री.योगेश केदारी यांनी केले तर आभार उपसरपंच श्री.रोहिदास जांभुळकर यांनी मानले. 
सरपंच व उपसरपंच यांच्या पाठपुराव्यामुळे गोवित्री ग्रामपंचायत अंतर्गत वळवंती रस्ता 10 लक्ष, कोळवाडी स्मशानभूमी रस्ता 10 लक्ष, भाजगाव रस्ता 10 लक्ष, कोळवाडी येथे सामाजिक सभागृह 10 लक्ष, वळवंती व्यायामशाळा साहित्य 7 लक्ष, वळवंती विद्युत लाईन 3 लक्ष अशा एकूण 50 लक्ष रुपयांच्या विकास कामांना निधी मिळाला आहे.
यावेळी खासदार श्रीरंगअप्पा बारणे व मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन खासदार श्रीरंगअप्पा बारणे यांच्याकडून देण्यात आले. तसेच बाळासाहेब नेवाळे यांनी ग्रामपंचायतीकडून करण्यात येणाऱ्या कामांबद्दल सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचे कौतुक करण्यात आले. मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांकडून आभार मानण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या