Ticker

6/recent/ticker-posts

''द केरळा स्टोरी' हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावा यासाठी भाजपा विद्यार्थी आघाडी मावळ वतीने तहसीलदार मावळ यांना निवेदन....."द केरळा स्टोरी' हा चित्रपट जनजागृती करणारा - अभिमन्यू शिंदे


वडगाव दि.८- भाजपा विद्यार्थी आघाडीच्या वतीने "द केरळा स्टोरी" हा चित्रपट टॅक्स फ्री व्हावा यासाठी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
       द केराला स्टोरी चित्रपट संपूर्ण देशामध्ये प्रदर्शित झाला. केरळ राज्यामध्ये जवळजवळ 32000 मुली ह्या लवजिहाद यांच्या जाळ्यात अडकून त्या परदेशी आतंकी संघटनांमध्ये जबरदस्तीने जोडल्या गेल्या आहेत. अशा घटना देशांमध्ये रोज कितीतरी घडत आहेत. अशा घटना होऊ नये म्हणून सदर चित्रपटांमध्ये वास्तव्य चित्र दाखवण्यात आले आहे. चित्रपट पाहिल्यामुळे विद्यालियन तरुणीमध्ये जनजागृती होऊन त्या या लवजिहाद जाळ्यात अडकणार नाहीत. चित्रपट हा जनजागृती करणारा असून मध्य प्रदेश सरकारनेही 'टॅक्स फ्री' केला आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने हा चित्रपट टॅक्स फ्री करावा यासाठी भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडीच्या वतीने मा.राज्यमंत्री बाळा भेगडे,जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,प्रभारी भास्कर,आप्पा म्हाळस्कर,तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन देण्यात आले.

       यावेळी तालुकाध्यक्ष अभिमन्यू शिंदे, शिवसेना युवा प्रमुख दत्ता केदारी, दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंबोरे ,प मा अध्यक्ष प्रशांत लगड,अं.मा.अध्यक्ष विठ्ठल तुर्डे,उपाध्यक्ष  धामनकर, उपाध्यक्ष अक्षय म्हस्के,सरचिटणीस कृष्णा ठाकर,सोशल मीडिया उपाध्यक्ष विकास घारे, प्रणव नेवाळे,विकी म्हाळस्कर तसेच जेष्ठ पदाधिकारी गणेश भांगरे,बाळासाहेब जाधव,विनायक भेगडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या