Ticker

6/recent/ticker-posts

बाळा भेगडे यांच्या प्रयत्नाने थोरण ( करंजगाव) येथील बालकास उपचारासाठी मिळाले १ लाख रुपये ....


मावळ दि. ३१- मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून थोरण (करंजगाव) मधील बालकास १ लाख रुपये आर्थिक सहाय्य मिळाले .

      काही दिवसांपासून सूर्या मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटल हिंजवडी,वाकड पुणे येथे  करंजगाव मधील लहान बालक आजाराने ग्रास्त होते.मोहीते कुटुंबाने  आर्थिक मदत मिळावी यासाठी मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्याकडे संपर्क केला असता त्यांनी लगेचच मुख्यमंत्री साह्यता कक्षाला फोन लावत सुत्रे हलवली दि. ३० रोजी बाळाच्या उपचारासाठी १ लाख रुपयाची मदत खात्यावर जमा झाली.
  काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून यावर तोडगा काढण्यात आला होता एका मिसकॉलवर आता निधी मिळणे शक्य होणार आहे. यासाठी ८६५०५६७५६७ हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर मिसकॉल देताच तत्काळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अर्ज आपल्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या