कामशेत - श्री संत ज्ञानेश्वर माऊली समाजसेवा चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित भव्य गोशाळा उद्घाटन सोहळा निमित्त ताजे ता.मावळ येथे गुरुवार दिनांक १२/१/२०२३ ते सोमवार दिनांक १६/१/२०२३ रोजी सायं ६ ते रात्री ९ वा. या वेळेत भागवताचार्य ह.भ.प.तुषार महाराज दळवी यांचे संगीत श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे .
कार्यक्रमा निमित्त सायं ५ ते ६ वा.श्री विठ्ठल रुक्माई भजनी मंडळ व बाल भजनी मंडळ ,ताजे यांचा हरिपाठ होणार आहे. तसेच मंगळवार दिनांक १७/१/२०२२ स. ९ ते ११पर्यत भागवताचार्य ह.भ.प. पोपट महाराज कासारखेडकर यांचे कीर्तन होणार आहे.
या कार्यक्रमा निमित्ताने विविध क्षेत्रावरील काम करणारे मान्यवर ,गायक, वादक,टाळकरी,विणेकरी कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे.अशी माहिती आयोजक यांच्या वतीने देण्यात आली आहे.
0 टिप्पण्या