देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९८ वी जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत अनेक विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला. भारतीय जनता युवा मोर्चा पुणे जिल्हा ग्रामीण तर्फे हिंजवडी येथे स्पर्धा घेण्यात आल्या. युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष किरण दगडे पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे नियोजन भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस जिवन साखरे यांनी केले. परीक्षक म्हणून रोहन कवडे हे उपस्थित होते.
यावेळी भाजयुमो प्रदेश सदस्य तथा पुणे ग्रामीण प्रभारी अजित कुलथे, भाजपा मुळशी मंडल अध्यक्ष विनायक ठोंबरे, सरचिटणीस हनुमंत आप्पा चव्हाण, कार्याध्यक्ष राजाभाऊ वाघ, भाजपा महिला मोर्चा मुळशी तालुका अध्यक्षा वैशालीताई सणस, भाजयुमो मुळशी तालुका उपाध्यक्ष प्रेम साखरे, मनोर अण्णा सणस, संजय जाधव, शुभांगी ताई दिसले, सतीश कांबळे, रितेश साखरे यांच्या सह स्पर्धक उपस्थित होते.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक चैतन्य बनकर, द्वितीय क्रमांक ओम जाधव आणि तृतीय क्रमांक आदील बनसोडे यांचा आला. वक्तृत्व स्पर्धेसाठी नरेंद्र मोदी यांचा डिजिटल सुशासनावर भर देतो, भारत पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे, फुकटच्या राजकारणातून विकासाच्या राजकारणाकडे जाणे काळाची गरज आणि नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे युवकांच्या सक्षमीकरणावर लक्ष्य आहे, हे विषय देण्यात आले होते.
0 टिप्पण्या