कार्ला :- एकविरा विद्या मंदिर कार्ला येथे संविधान दिनानिमित्त माजी विद्यार्थ्यांतर्फे बाबासाहेब आंबेडकर व संत तुकाराम महाराज यांविषयी श्री विठ्ठल काळोखे देहू यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते.
भारतीय संविधानाचा स्वीकार ज्या दिवशी केला गेला तो दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर. दरवर्षी हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस राष्ट्रीय कायदा दिन म्हणून पण ओळखला जातो. १९४९ मध्ये यादिवशी भारतीय संसदेने अधिकृतपणे संविधानाचा स्वीकार केला. २६ जानेवारी १९५० पासून संविधान देशात लागू झाले. १९ नोव्हेंबर, २०१५ रोजी केंद्रीय सामाजिक आणि सशक्तीकरण मंत्रालयाने २६ नोव्हेंबर संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. तरी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व शिक्षक वर्ग सेवक वर्ग आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सामुहिक संविधान वाचन करून संविधान दिन साजरा केला.
यावेळी एकविरा विद्या मंदिर शाळेचे प्राचार्य पारखी सर उमेश इंगुळकर सर संतोष हुलावळे सर बाबाजी हुलावळे सर व शाळेतील इतर शिक्षक व शिक्षिका आणि शाळेचे माजी विद्यार्थी अमोल भाऊ भेगडे किसन भाऊ येवले नवनाथ कोंडभर आर टी ओ कैलास भानुसघरे ह भ प अनिता महाराज मोरे इत्यादी कार्यकर्ते व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
0 टिप्पण्या