वसुंधरा न्युज दि.२६- मावळ तालुक्यात भारतीय जनता पार्टी वतीने वेदांता-फॉक्सकॉन बाबत महाविकास आघाडी विरोधात व आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी या साठी आज दि.२६ रोजी वडगाव पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन केले.दोन दिवसापुर्वी याच ठिकाणी महाविकास आघाडी ने जन आक्रोश आंदोलन केले होते.यात दीड वर्षापासून वेदांता-फॉक्सकॉन कंपनीसाठी ज्या काय फॅसिलिटी लागत होत्या त्या पुरवण्याचे काम महाविकास आघाडी नी केले.तसेच आदित्य ठाकरे यांनी फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याचे सांगत याचे दोषरोप शिंदे-फडणविस सरकारवर केले होते .
ठिय्या आंदोलनामध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी जोपर्यंत लेखी स्वरुपात प्रशासना कडून उत्तर येत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन चालूच राहणार अशी भूमिका घेतली होती. मावळ तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडून वेदांता-फॉक्सकॉन सोबत कोणताही MOU उद्धव सरकारने केला नसून,तसेच बाबत जमिन संपादन केलेले नाही आसे लेखी स्वरूपात पत्र दिलेने भाजपाकडून आंदोलन मागे घेण्यात आले.
पत्र मिळाल्याने आमदार राम कदम यांनी आपल्या भाषणात म्हटले की "आदित्य ठाकरे यांचा खोटारडेपणा हा महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडणार"
मविआ सरकारच्या काळात मुख्यमंत्री ठाकरे दहा मिनिटेसुद्धा घराबाहेर पडत नव्हते. ते मंत्रालयात देखील मोजून पाच वेळा गेले, सहाव्या वेळेस गेले असतील तर दाखवा आणि एक कोटी रुपये जिंका अशी ऑफर आमदार राम कदम यांनी यावेळी दिली.
जगाच्या इतिहासामध्ये एकमेव घटना अशी आहे जिथे मंत्री सोडून गेले. तीन पक्षांचे जे सरकार होते ते खऱ्या अर्थाने फुटक्या पायाचे होते. त्याचबरोबर मविआचे सरकार हे दळभद्री सरकार होतं. सत्तेत आल्यापासून सगळे बंद अशी अवस्था होती. मंदिरे बंद आणि दारूचे दुकाने सुरू होती. मात्र राज्यात एका विचाराचे आमदार, खासदार एकत्र आले. एका विचाराचे शिंदे-फडणवीस सरकार आले आणि सर्व सण उत्सव सुरू झाले असे राम कदम म्हणाले.
यावेळी मा.राज्यमंत्री बाळा भेगडे,खासदार श्रीरंग बारणे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,प.महाराष्ट्र अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे,सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे,तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे,मा.उपसभापती शांताराम कदम,अतुल देशमुख,मा.नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव,RPI अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड,शिवसेना प्रमुख राजु खांडभोर,युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे,महिला आघाडी अध्यक्ष सायलीताई बोत्रे, अध्यक्ष विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे, वडगाव शहर अध्यक्ष अनंता कुडे आदी कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आपले मनोगत मांडले.
कार्यक्रमात जिल्हा पदाधिकारी ,तालुका पदाधिकारी, महिला आघाडी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस सुनील चव्हाण, विश्वनाथ जाधव यांनी केले
0 टिप्पण्या