कामशेत दि.१५- कामशेत मधील प्राथमिक आरोग्य केंद्र या शासकीय दवाखान्यात डिलिव्हरी करण्यासाठी एक भगिनी दाखल झाली होती परंतु त्या ठिकाणी निवासी डाॅक्टर नसल्याने वेळीच उपचार न ,मिळाल्याने त्या भगिनी चे बाळ दगावले होते.
सदर घटनेची गांभीर्याने दखल घेत आज दि .१४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे (co) आयुष प्रसाद यांनी डॉक्टर किरण जाधव यांची तात्काळ बदली केली आहे.
या घटने विरोधात कामशेत येथील नागरिक संतप्त झाले होते. भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे यांनी या घटनेची दखल घेत पुणे जिल्हा सीओ आयुष प्रसाद यांना तात्काळ या घटनेची माहिती दिली होती.त्यांनी घटनेची चौकशी करून कारवाई करू असे आश्वासन दिले होते.
कामशेट मधील पुणे जिल्हा RPI युवक अध्यक्ष समीर जाधव,सामाजिक कार्यकर्ते दत्ता काजळे, मा.ग्रा.पं .सदस्य सुभाष गायकवाड ,शहराध्यक्ष प्रवीण शिंदे,सामाजिक कार्यकर्ते किशोर ओव्हाळ,मा ग्रा.पं. सदस्य संतोष कदम,सामाजिक कार्यकर्ते गणेश लालगुडे, सोनू गायकवाड ,सनी टकले,समीर भोसले यांनी संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली होती.तसेच कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.

0 टिप्पण्या