मावळ : मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा महावितरण कार्यकारी अभियंता, खेड यांना फोन आणि 6 तासांत मुंढावरे गावाला मिळाला ट्रान्सफॉर्मर...
आज बालाजी चेंबर्स, तळेगाव दाभाडे जनसंपर्क कार्यालय येथील जनता दरबारात मुंढावरे गावचे मा.सरपंच बाळासाहेब वाघमारे, मा.ग्रा.पं. सदस्य शेखर वाघमारे हे गावातील ट्रान्सफॉर्मर बिघडलेले असल्याने गाव अंधारात आहे असे समस्या घेऊन आले होते.
त्यावर मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी महावितरण कार्यकारी अभियंता,खेड यांना फोन करून तात्काळ आजच्या आज मुंढावरे आणि कशाळ येथे ट्रान्सफॉर्मर बसवून गावकऱ्यांची समस्या दूर करण्यास सांगितले.
महावितरण कार्यकारी अभियंता यांनी तात्काळ मुंढावरे गावात ट्रान्सफॉर्मर पाठवून दिला.
0 टिप्पण्या