मावळ दि.८-भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वडगाव येथे भाजपा पक्ष कार्यालया मधे आढावा बैठक आज संपन्न झाली . बैठकीत महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा सदस्य अजित कोलते तसेच युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस जीवन साखरे उपस्थित होते .
या बैठकीत मागील करोणा काळातील कार्यक्रमा बद्दल आढावा घेऊन आगामी काळातील कार्यक्रम घेण्याचे नियोजन करण्यात. यावेळी पदाधिका-यांना मार्गदर्शन करताना युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे यांनी "केंद्र सरकारच्या सर्व योजना या ग्रामीण भागात राबवणार असून युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी सोशल मीडिया युवा वॉरियर व इतर आघाडीतील सर्व पदाधिकारी यांच्यामध्ये सहभागी होणार आहेत असे बोलताना सांगितले."
या बैठकीत कार्याध्यक्ष अर्जुनभाऊ पाठारे,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे,वडगाव शहर अध्यक्ष विनायक भेगडे, जि.यु.वॉ. संयोजक संस्कार चव्हाण,युवती आघाडी अध्यक्ष सुवर्णाताई गायकवाड,युवा वारिअर्स अध्यक्ष अक्षय पिंगळे,संघटक यादव सोरटे, संघटनमंत्री रामभाऊ गोपाळे, कामशेत शहराध्यक्ष प्रवीण शिंदे,संजय वाजे,अक्षय भेगडे,सचिन कदम,रामनाथ शेटे,प्रतीक बोडके,विशाल रसाळ,अभिजित नाटक,सागर नाटक,रविंद्र मुर्हे,संदीप नाटक,ऋतुराज काशीद,विठ्ठल तुर्डे,संतोष असवले,राजू पेटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या