Ticker

6/recent/ticker-posts

मा. राज्यमंत्री संजय(बाळा)भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्यहाफपिच क्रिकेट स्पर्धा संपन्न....

पवनानगर : माजी राज्यमंत्री संजय(बाळा)भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त येळसे येथे  भरत ठाकर प्रतिष्ठान ,शहिद कांताबाई ठाकर प्रतिष्ठान व शंभुराजे क्रिकेट कल्ब यांच्या वतिने भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. 

 या स्पर्धेमध्ये पद्मावती क्रिकेट क्लब आंबळे या संघाने विजेतेपदावर मोहर उमटवली तर इलेव्हन चॅलेंजर आढले हा संघ उपविजेतेपदाचा मानकरी ठरला.
या संघाना पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले . शंभुराजे क्रिकेट कल्ब आयोजित राज्यमंत्री चषक स्पर्धा १ जानेवारी ते ६ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती.

तीन दिवस पवनमावळ हाफ,  चौथ्या दिवशी मावळ तालुका हाफ, पाचव्या दिवशी ओपन हाफ तर सहाव्या दिवशी फायनल या प्रमाने हि स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

 या स्पर्धेमध्ये २४ संघांनी सहभाग घेतला तर या स्पर्धेमध्ये तृतीय पारितोषिक निलेशभाऊ ठाकर स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाने तर तानाजीभाऊ शेंडगे युवा मंच मळवंडी ढोरे, चौथ्या क्रमाकांचा मानकरी ठरला.तर प्रगती क्रिकेट क्लब दुधीवरे हा संघ पाचव्या क्रमांकाचा मानकरी ठरला. तसेच उत्कृष्ट गोलंदाज,फलंदाज व मालिकाविर अशी विविध पारितोषिके देण्यात आली.

या सर स्पर्धेतील चषके हि स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरले स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झालेल्या आंबळे संघ व आढले संघ या संघानमध्ये शेवटच्या सामन्यामध्ये चुरस पहायला मिळाली या अटी तटीच्या लढतीमध्ये आंबळे  संघाने विजेतेपदावर शिक्का मोर्तब केला या स्पर्धेला माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हा परिषद सदस्य,तालुका अध्यक्ष, पंचायत समिती सदस्य यांच्या सह मावळ तालुक्यातील मान्यवरांनी उपस्थिती लावली.
बक्षीस वितरण गोधाम इकोव्हिलेज चे अध्यक्ष नितीन घोटकुले,धनंजय टिळे महागाव चांदखेड गटाचे अध्यक्ष माऊली आडकर, फुल उत्पादक संघाचे अध्यक्ष मुकुंद ठाकर, संजय केदारी, तानाजी शेंडगे, सतिष ठाकर, ग्रामपंचायत सदस्य निलेश ठाकर, सचिन सुतार, मंगेश सुतार आकाश ठाकर, विकास ठाकर आदींच्या हस्ते करण्यात आले.

 या स्पर्धेचे मुख्य आयोजन भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस गणेश ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शंभुराजे क्रिकेट कल्ब संघाच्या कार्यकर्त्यानी विषेश मेहनत घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या