वडगाव मावळ दि.२ - वडगाव मावळ येथे पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरण पीएमआरडीए PMRDA यांच्या प्रारूप विकास आराखड्याबाबत मार्गदर्शन शिबिर भेगडे लॉन्स येथे संपन्न झाले .त्यावेळी पुणे जिल्ह्यातील ८१४ गावात ६९०० चौ.कि.मी जमिनीवर PMRDA ने प्रारूप आराखडा तयार केला. यात मावळ तालुक्यातील अनेक नागरिकांच्या तसेच शेतकर्यांच्या जमिनीवर चुकीच्या पद्धतीच्या आरक्षण पडली तसेच अनेक त्रुटी आराखड्यात आहेत त्यामुळे मावळ तालुक्यातील नागरिकांचे व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे . नागरिकांनी हरकती कशा नोंदवाव्यात या बाबत कायदेतज्ज्ञ सुधाकर आव्हाड व अँड उमेश तारे यांनी या बाबत मार्गदर्शन केले .
PMRDA तयार केलेल्या प्रारूप आराखड्यात प्रचंड प्रमाणात चुका असून हा आराखडा शेतकऱ्यांवर, नागरिकांवर अन्याय करणारा आहे . नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी नोंदवलेल्या हरकती PMRDA ने विचारात घेऊन प्रत्येक तालुक्यात नागरिकांची वेगळे सुनावणी घेतली पाहिजे या वेळी शेतकऱ्यांनी दिलेल्या हरकती विचारात घेतल्या नाही तर वेळ प्रसंगी मुंबई हायकोर्टात जाण्याची तयारी ठेवावी लागणार आहे असे प्रतिपादन मा. राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केले.
या वेळी जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे,लोकसभा प्रभारी प्रशांत ढोरे,युवा मोर्चा अध्यक्ष संदिप काकडे,सभापती ज्योती शिंदे,महिला आघाडी अध्यक्षा सायलीताई बोत्रे,जि.प.सदस्य नितिन मराठे,गणेश धानिवले, मा.सभापती दत्ता शेवाळे ,मा.सभापती गुलाबकाका म्हळस्कर, शांताराम कदम, ज्ञानेश्वर दळवी, अँड रविंद्र दाभाडे, नगराध्यक्ष चित्राताई जगनाडे, सरचिटणीस सुनिल चव्हाण, मच्छिंद्र केदारी, संचालक शामराव राक्षे, संतोष कुंभार, कार्याध्यक्ष अर्जुन पाठारे,विद्यार्थी आ. अध्यक्ष अभिमन्यू शिंदे,सोशल मि.अध्यक्ष सागर शिंदे, क्रीडा आ. अध्यक्ष नामदेव वारींगे, धनगर प.अध्यक्ष नामदेव शेडगे, अमोल केदारी, सचिन येवले, ओबीसी अध्यक्ष रवींद्र विधाटे, किसान मोर्चा अध्यक्ष सुभाष धामणकर, आदी मान्यवर नागरिक, शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
_____________________________
0 टिप्पण्या