पवनानगर दि.१७ - विकास एजुकेशन & विकास सोशल फाउंडेशन च्या वतीने श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विदयालय( शिवली,भडवली) येतील गरजू व निराधार मुलांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. प्रत्येक गरजु लाभार्थ्यांपर्यंत मदत पोचवण्याचा विकास एज्युकेशन & विकास सोशल फाउंडेशन या संस्थेचा उद्देश आहे असे संस्थापक विकास लिबोरे यांनी वसुंधरा न्युज ला बोलताना सांगितले.
या वेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास लिंभोरे , सदस्य संतोष राजीवडे, सदस्य रमेश येवले, लक्ष्मण शेलार सर ह्या विद्यालयाचे मुख्याध्यापक जाधव सर, थोरात सर, ठोंबरे सर, इतर शिक्षक वृंद, कार्यालयीन कर्मचारी तसेच पालक उपस्थित होते.
-----------------------------
0 टिप्पण्या