कामशेत दि.२२ - मावळ तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. बुधवारी (दि.२१) रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.
इंद्रायणी नदीला पूर आल्याने नदीपात्रातील पाणी कामशेत, वाकसई चाळ, कार्ला, मळवली, देवले, बोरज, सदापूर, वेंदात आश्रम, व्हेकिंज पोल्ट्री, संपर्क बालग्राम या परिसरात पाणी पसरले असल्याने येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून हॕबीडेट घरकुल सोसायटीच्या घराघरात पाणी शिरल्याने रहिवाश्यांना जीव मुठीत धरुन रात्र काढावी लागली. हिच स्थिती परिसरात ठीकठिकाणी होती.
अनेक ठिकाणी भराव करुन सुरक्षा भिंतीमुळे पावसाचे नैसर्गिक प्रवाह बंद झाले आहे. यामुळे मोठा पाऊस झाल्यास या नदी नाल्यांचे पाणी जागा मिळेल त्या भागात पसरत असल्याने कामशेट इंद्रायणी कॉलनी मध्ये नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरत आहे तसेच धावडी कॉलनी येथे संपुर्ण पाण्याने भरले आहे. दरवर्षी ह्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप पुरग्रस्त नागरिक करत आहेत. तरी मावळ प्रशासनाने अशा बांधकांमाची पाहणी करुन नाले ओढ्यांवर करण्यात आलेली बांधकामे तसेच वळवण्यात आलेले प्रवाह पुर्वीसारखे करावे, अशी मागणी भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष मा.सरपंच अभिमन्यु शिंदे यांनी केली आहे.
-----------------------------
0 टिप्पण्या