राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती व मायमर मेडिकल कॉलेज व तळेगाव दाभाडे नगर परिषद यांचे संयुक्त विद्यमाने मंगळवारी मायमर मेडिकल रुग्णालयात 60 बेडचे 'स्वर्गीय नथूभाऊ भेगडे पाटील कोविड विलगीकरण केंद्रा'ची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह मुकुंदराव कुलकर्णी, माईमरच्या संचालिका सौ सुचित्रा ताई नांगरे , नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे , जनकल्याण समितीचे समीर पाटील , डॉ गुप्ता यांच्या हस्ते सदर कोविड केंद्राचे उदघाटन पार पडले.
यावेळी जनकल्याण समितीचे अध्यक्ष उदयराव कुलकर्णी, मायमर मेडिकल कॉलेजचे डॉक्टर धनाजी जाधव, आयुर्वेदाचार्य डॉ. ज्योती मुंडर्गी, डॉ गुरुप्रसाद कुलकर्णी , डॉ स्वप्नाली बवरे , संघाचे जिल्हा सहकार्यवाह उन्मेष बेळगीकर, मावळ तालुका कार्यवाह सोमनाथ दाभाडे, तळेगाव नगर प्रमुख गौरव वालझाडे यावेळी उपस्थित होते.
रा.स्व.संघाचे पुणे जिल्हा माजी संघचालक स्वर्गीय नथूभाऊ भेगडे यांनी अनेक वर्षे तळेगाव जनरल हॉस्पिटल मधील पेशंटची विचारपूस व आधार देण्याचं काम केले.त्यामुळे या केंद्राला स्वर्गीय नथूभाऊ भेगडे यांचे नाव देण्यात आले आहे. या केंद्रामध्ये कोविड बाधित परंतु सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. डॉक्टरांच्या देखरेखीखाली व स्वयंसेवकांच्या मदतीने रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. यामध्ये आयुर्वेदीक पद्धतीचे काढा ,योग व समुपदेशन यावर भर असणार आहे. मुख्य म्हणजे आपण पाहतो की, लक्षणे नसलेले रुग्ण ज्याला काही झालेले नाही परंतु तो बाहेर फिरला की त्याच्यामुळे कोरोना मोठ्या प्रमाणात परसतो . किंवा ज्यांना कोरोना झालेला आहे पण घरात राहायला जागा नाही व त्यामुळे पुर्ण घरच बाधित होण्याचा धोका असतो अशांसाठी हे केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. त्यांना याठिकाणी संपूर्ण मोफत जेवणाची व्यवस्था, उपचार ,समुपदेशन करुन बरे करण्याचे काम करण्यात येणार आहे.केंद्राची सर्व व्यवस्था डॉक्टर राहुल मुंगीकर व यतिनभाई शहा हे पाहणार आहेत. प्रवेशासाठी संपर्क डॉ.राहूल मुंगीकर 9822611128
-----------------------------