वडगाव मावळ दि.५ -पश्चिम बंगाल येथे ममता बॅनर्जी यांच्या TMC काँग्रेसच्या गुंड कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने भाजपा कार्यकर्ते यांची हत्या करण्यात आली तसेच जाळपोळ,लुटमार करुन माता भगीनींवर बलात्कार करण्यात आले या निषेधार्थ वडगाव येथे भारतीय जनता पार्टी मावळ तालुका यांच्या वतीने पंचायत समितीसमोर निषेध करण्यात आला या प्रसंगी मावळ तालुक्याचे मा. सभापती गुलाबकाका म्हाळस्कर ,मा. उपसभापती शांतारामबापू कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा निषेध मोर्चा काढण्यात आला याचे पत्र निवेदन मावळ तहसीलदार यांना देण्यात आले याप्रसंगी सरचिटणीस सुनील चव्हाण ,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, प्रसिद्धीप्रमुख आनंता कुडे, वडगाव शहर अध्यक्ष किरण भिलारे ,दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंबोरे, हरिभाऊ दळवी कल्पेश भोंडवे, समीर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
पश्चिम बंगाल येथे प्रकार हा दुर्दैवी असून तेथील तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी -शांताराम कदम