Ticker

6/recent/ticker-posts

Pune-जिल्हा परिषद निधी,शासन निधी खर्च करायचे अधिकार सरपंच यांना देण्यात यावे...

पुणे दि.८ - पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषद निधी, शासन निधी व अभिकरण निधी यासाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्याची सूचना केली आहे. हे खाते ग्रामसेवक व गटविकास अधिकारी चालविणार आहेत. 
   
                सरळ सरळ ग्रामपंचायत आणि सरपंच यांच्यावरती अविश्वास व्यक्त केला असून ग्रामपंचायत ही घटनात्मक संस्था आहे, सरपंच व ग्रामपंचायतीला पूर्ण अधिकार असले पाहिजेत, त्यांचे अधिकार पुन्हा देण्यात यावेत, याविषयी आज मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे पुणे जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष श्री गणेश भेगडे (Ganesh bhegade)यांनी केली आहे. वरील निवेदन ई-मेल द्वारे दोन्ही अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.
-----------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या