भारतीय जनता पक्षाने मला काय दिले..!
भारतीय जनता पक्षात निस्वार्थी राष्ट्र प्रेरणाने काम करणारे असंख्य कार्यकर्ते पहायला मिळतात त्यात प्रामुख्याने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी ,पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी आपलं संपूर्ण जीवन हे राष्ट्रासाठी समर्पित केले व राजकीय क्षेत्रात नवीन्यपूर्ण समानता मानववाद ,अंतोदय यांचे प्रेरक राहिले आजही भारतीय जनता पक्षामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाचा निश्चितच न्याय मिळतो याचे उदाहरण पंढरपुर- मंगळवेढा पोटनिवडणूक मध्ये दिसतो.
या निवडणूक मधे मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली ४०० कार्यकर्ते यांची टिम या निवडणूक मधे उतरली होती त्यात मंगळवेढा ची जबाबदारी अभिमन्यु शिंदे,सुनील चव्हाण,सागर शिंदे,नामदेव शेडगे ,समीर भोसले शहराची संघटनात्मक जबाबदारी दिली होती ती त्यांनी १३ दिवस तेथे राहून प्रामाणिकपणे दिलेली जबाबदारी पार पाडली निवडणूकही झाली त्यामध्ये समाधान दादा विजयी झाले पण काल अचानक बाळाभाऊ चा फोन आला की मुंबईला जायचे मुंबईला गेल्यानंतर माझे व माझ्या सहकार्यांचे मा. मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी कामाचं कौतुक केलं त्यावेळी वाटलं की भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता म्हणून नक्कीच न्याय मिळतो आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वरिष्ठ नेत्याकडून शाबासकीची थाप मिळते एक मन भरून जाते हे भारतीय जनता पार्टीतच पाहायला मिळते .पक्षाने मला काय दिले या पेक्षा माझे पक्षासाठी काय योगदान आहे हे महत्वाचे असे भाजपा विद्यार्थी अध्यक्ष मावळ अभिमन्यु शिंदे यांनी या वेळी सांगितले .
0 टिप्पण्या