Talegaon : तळेगाव शहरात हल्ली अनधिकृतपणे काहि जण शुभेच्छाचे,उदघाटनाचे इतर अनेक कारणांनी जाहिरात फलक लावत असतात.पण हे फलक लावताना आवश्यक ते शुल्क भरून परवानगी घेत नसतात. त्यातच मोठ्या राजकीय व्यक्तीशी संबंधित फलक असेल तर कसलेही शुल्क न भरता शहरात जाहिरात फलक लावले जातात.
मात्र तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक संतोष दाभाडे,विरोधी पक्षनेते व तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश काकडे,माजी उपनगराध्यक्षा,विद्यमान नगरसेविका वैशाली दाभाडे,नगरसेवक संतोष भेगडे आदींनी नगरपरिषदेकडे नियमानुसार शुल्क भरून फलक लावले आहेत.त्याबद्दल स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती किशोर भेगडे यांनी सर्वांचे कौतुक केले.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या आरोग्य आणि स्वच्छता समितीच्या सभापतीपदीचा कार्यभार स्वीकारल्यानंतर किशोर भेगडे यांनी प्लॅस्टिक बंदी,शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत जाहिरात फलकावर कारवाई यांसारखे निर्णय घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी केली.त्याच्या या निर्णयामुळे शहराच्या सुंदरेत तसेच स्वच्छतेत भर पडली आहे.
-----------------------------
वसुंधरा न्युज
-----------------------------
0 टिप्पण्या