वडगाव – विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असणारे मालेवाडी येथे सर्वसामान्य कुटुंबातील धाऊ मरगळे त्यांच्या मुलासाठी लॅपटॉप ची आवश्यकता होती ही गोष्ट त्यांनी भारतीय जनता पार्टी सरचिटणीस सुनील चव्हाण यांना बोलून दाखवली सरचिटणीस यांनी वडगाव नगरपंचायतीच्या मा. उपनगराध्यक्षा विद्यमान नगरसेविका मायाताई चव्हाण तसेच अमर चव्हाण यांना याविषयी माहिती दिली असता त्यांनी लगेच एक लॅपटॉप भाऊ मरगळे यांच्या मुलांसाठी पाठवून दिला त्यांचा मुलगा एस.वाय. बीकॉम मध्ये शिकत आहे. त्यांना लॅपटॉप मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.
समाजाची बांधिलकी जपणारे चव्हाण कुटुंबीय यांचं सरचिटणीस सुनील चव्हाण यांनी आभार मानले असेच दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन समाजातील गरीब विद्यार्थ्यांना अशी मदत झाली तर निश्चितच ही मुले पुढे डॉक्टर, इंजिनियर अशा विविध क्षेत्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील असे यावेळी म्हणाले यावेळी भा. ज. पा. विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे तसेच दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष विकास भाऊ लिंबोरे ,आनंदा येवले उपस्थित होते.
_________________
वसुंधरा न्यूज मावळ
_________________
0 टिप्पण्या