Ticker

6/recent/ticker-posts

◆ वडगाव :-मावळ तालुका भाजपा किसान मोर्चाच्या वतीने तहसीलदार कार्यालयात निवेदन... ◆ कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५०००० रुपये प्रोत्साहनपर रक्कम त्वरीत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्याची मागणी...

वडगाव:- मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत विविध कार्यकारी सोसायटीकडून घेतलेल्या कर्जाची नियमित व वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या ५००००रु.प्रोत्साहनपर रक्कम शेतकरी सभासदांच्या बँक खात्यावर त्वरित जमा करावी यासाठी मावळ तालुका भाजपा किसान मोर्चाच्या वतीने तहसिलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले.
       यावेळी मावळ तालुका किसन संघ अध्यक्ष सुभाषराव धामणकर,विकास शेलार (कार्याध्यक्ष),अनंता कुडे(प्रसिद्धी प्रमुख),सुनील चव्हाण (सरचिटणीस) उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या