मावळ - महाविकास आघाडी सरकारने राज्यातील ७२ लाख वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
करोना काळात जनतेला वीज बिल माफ करण्याचे आश्वासन देणारे सरकार आता सक्तीने वीज बिल वसूल करून जनतेला नाहक त्रास देत आहे राज्य सरकारच्या या मनमानी कारभाराविरोधात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते दिनांक ५/२/ २०२१ रोजी संपूर्ण राज्यभर महावितरणाच्या कार्यालयांना टाळे ठोकणार आहे महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या या निर्णयानुसार मावळ तालुका भाजपाच्या वतीने ५ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता वडगाव येथे महावितरणाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येणार आहे व तसेच माननीय तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन सादर करणार आहे. असे मावळ तालुका भारतीय पार्टीचे अध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी सांगितले .
0 टिप्पण्या