कामशेत - कामशेत मध्ये शिंदे करंडक २०२१ तसेच बाजीराव शिंदे स्पोर्ट फाउंडेशन यांच्या वतीने हापपिच क्रिकेट स्पर्धेचे उद्या दिनांक ५/२/२०२१ रोजी आयोजन करण्यात आले असुन उद्घाटन सकाळी दहा वाजता होणार आहे .या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक -२०००१ रुपये ,दृतिय क्रमांक १५००१/- रुपये , तृतीय क्रमांक १०००१/-, चतुर्थ क्रमांक ७००१/- आणि पंचम क्रमांक ५००१/-असे बक्षीस असून प्रत्येक क्रमांकाच्या संघास भव्य चषक असे ठेवण्यात आलेले आहे.
क्रिकेट स्पर्धेचे आयोजन एचपी पेट्रोल पंप कामशेत ,श्री राम राईस मिल समोर मैदानावर होत असून हे शिंदे करंडक स्पर्धेचे तिसरे वर्ष असून या स्पर्धेसाठी तालुक्यातून भरघोस असा प्रतिसाद मिळाला आहे या वर्षीही चांगला प्रतिसाद असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.


0 टिप्पण्या