मावळ तालुक्यात दिव्यांग बांधवांनी महाराष्ट्रात अस काम केल आहे याच संपुर्ण तालुक्यात कौतुक होत आहे.
चिखालसे येथील दिव्यांग भगीनी अनिता शिवराम खाणेकर लग्न झाले परंतु नवर्याशी घटस्फोट झालेमुळे बेघर झाली तीला आधार कोणाचा नव्हता भाऊ चांगले होते त्यांनी अनिता हिला आधार दिला परंतु स्वताचे घर नसले मुळे अनिता सतत दुःखी असायची स्वताचे घर हवेच या भावनेने त्यांनी मनातील गोष्ट विकास लिंभोरे यांना बोलुन दाखवली त्यानी तीला लगेचच विकास लिंभोरे दिव्यांग फाउंडेशन वतीने एक लाख रुपये मदत केली तसेच दिव्यांग बांधवांनी हिला आपल्या आर्थिक मदती प्रमाणे प्रत्तेकी दहा रुपयांपासून ते एक हजार रुपये पर्यत मदत केली आहे आज दि.१३/२/२०२१ रोजी अनिता हिच्या घराचा भुमीपुजनाचा कार्यक्रम झाला येत्या काही दिवसांत घराचे काम होईलच यामुळे गोष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या दिव्यांग बांधवांनी प्रेरणादायी मिळेल असे काम केले आहे.
दिव्यांग बांधवांनी हे एकत्रित संघटित असल्यामुळे हे काम झाले आहे असे विकासभाऊं मोठ्या मनाने सांगतात अजूनही या समाज्यात अशा कित्येक माता-भगिनी वंचित आहे.त्याच्या पर्यत आपल्याला पोहचायचे आहे.या साठी दानशुर लोकांची मदत अपेक्षित आहे. सर्व दिव्यांग बांधवांनी एकत्र येऊन असे काम केले तर निश्चितच दिव्यांग हा दिव्यांगांचा आधार होऊ शकतो असे या गोष्टीमुळे कळते आहे.
भुमिपुजनाच्या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थितीमधे दिव्यांग आधार फाउंडेशन सर्व सभासद, विकास लिंबोरे, गणेश रोहमारे, संतोष राजिवडे, सुनील जाधव,बाळासाहेब सपकाळ आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते.
0 टिप्पण्या