Ticker

6/recent/ticker-posts

कामशेत शहरातील कचराकोंडी प्रश्न सोडवण्यात परिवर्तन पॅनला यश - शंकरनाना शिंदे

 कामशेत - कामशेत शहरांमध्ये कचरा कोंडीची समस्या मोठी निर्माण झाली होती. कामशेत ग्रामपंचायत यांची खामशेत येथील कचराकुंडी जागेचा करार संपला असल्याने शहरातील कचरा टाकण्यासाठी ग्रामपंचायतची मोठी तारांबळ उडाली होती.यामुुळे ग्रामपंचायतच प्रशासकीय अधिकारी पण त्रस्त झाले होते.
          ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता.हि कोंडी सोडवण्यासाठी परिवर्तन पॅनलचे प्रमुख ज्येष्ठ नेते शंकर शिंदे यांनी विशेष लक्ष देऊन कचरा प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.यामध्ये सहा प्रभागातील उमेदवार प्रवीण शिंदे,मोहन वाघमारे,संतोष कदम यांनी सहकार्य केले.

         याबाबत शंकर नाना शिंदे यांना विचारले असता "कामशेतचा कचरा प्रश्न खूप दिवसांपासून प्रलंबित असून त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा आम्ही केलेला आहे.येत्या काळात हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवून" असे सांगितले .
----------------------------- 
वसुंधरा न्युज मावळ
----------------------------- 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या