तळेगाव दाभाडे - पुणे पदवीधर मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार मा. श्री संग्रामभाऊ देशमुख यांच्या निवडणूक संदर्भात सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचा मेळावा गुरुवार दि.१९/११/२०२० रोजी सायं ४:३० वाजता ,वैशाली मंगल कार्यालय तळेगाव दाभाडे येथे आयोजित करण्यात येणार आहे .या मधे प्रमुख वक्ते भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्ष आमदार मा. श्री चंद्रकांत दादा पाटील यांचे मार्गदर्शन होणार आहे यात प्रमुख उपस्थिती (मा. राज्यमंत्री संजय तथा बाळा विश्वनाथ भेगडे ,पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश किसनराव भेगडे,तालुकाध्यक्ष ,पुणे पदवीधर मतदार नोंदणी प्रमुख रविंद्र आण्णासाहेब भेगडे ,जेष्ठ ,आदी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते ,पदवीधर मतदार उपस्थित राहणार आहे .अशी माहीती तालुका सरचिटणीस सुनिल चव्हाण यांनी दिली .
सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे अवाहन भारतीय जनता पक्ष मावळ वतीने केले आहे.
0 टिप्पण्या