अंतोदय विचाराचे प्रणेते आणि भारतीय जनसंघाचे द्वितीय अध्यक्ष स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या 104 व्या जयंती मोठ्या उत्साहाने नाणे मावळ मधील पाले नामा या गावी साजरी करण्यात आली.
यावेळी स्व.पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवना वार*मुख्य मार्गदर्शक सचिन भांडे अध्यक्ष मातंग आघाडी यांनी केले, यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये मावळचे विद्यमान उपसभापती दत्ताभाऊ शेवाळे, तसेच मा.सरपंच करंजगाव तानाजी पोटफोडे,रवि शेलार,उपसरपंच बजाबा हिले,मा.तंटामुक्ती अध्यक्ष इंदारामभाऊ उंडे, मधुकर गवारी पो.पाटील पाले, संतोष सरोदे , सौ जनाबाई गवारी आशा सेविका अदी ग्रामस्त उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन भाजपा मातंग समाज आघाडी अध्यक्ष सचिन भांडे,उपध्यक्ष संतोष आढाळगे, कार्यध्यक्ष सतिष राजगुरु, संघटक सागर भांडे व सर्व कार्यकर्ते यांनी केले .
0 टिप्पण्या