मावळ - भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे व पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा सप्ताह हा दिनांक 17 सप्टेंबर 2020 ते 2 ऑक्टोबर 2020 या कालावधी मध्ये सेवा सप्ताहाच्या आयोजन करण्यात आलेले आहेत.याची उद्या दि 17 सप्टेंबर 2020 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र टाकवे बु" तेथे स्वच्छता व वृक्षरोपण करुन या सप्ताहाचे सुरवात होणार आहे. यामध्ये विविध प्रमुख पदाधिकारी यांची कार्यकारीची रचना केली असून त्यामध्ये संयोजक हा प्रमुख असणार आहे यात १) वृक्षारोपण २) माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी जीवन कार्य प्रदर्शनी प्रचार व प्रसार करणे ३) खादी लोकर संवाद प्रचार व प्रसार ४) आत्मनिर्भर भारत प्रचार प्रसिद्धी प्रदर्शनी ५)आरोग्य शिबिर ६) रक्तदान शिबिर ७) नेत्रचिकित्सा शिबिर चष्मे वाटप ८)प्लाझ्मा दान ९)स्वच्छता शिबिर १०) 25 सप्टेंबर दीनदयाळ उपाध्याय जयंती कार्यक्रम प्रत्येक बुथ वरती घेणे ११) दिव्यांग शिबिर व तसेच अवयव उपकरण वाटप १२)आत्मनिर्भर भारत मंडळनिहाय वेबिनार लाईव्ह भाषण असे उपक्रम या सप्ताहामध्ये राबवले जाणार आहेत यात भारतीय जनता पार्टी चे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ज्येष्ठ हे सहभागी होणार आहेत अशी माहीती भाजपा मावळ तालुका सरचिटणीस सुनिल भाऊ चव्हाण यांनी दिली.
0 टिप्पण्या