Ticker

6/recent/ticker-posts

श्री राममंदिर उद्घाटन सोहळा निमित्त श्री पोटोबा महाराज देवस्थान चे वतीने प्रभु श्री राम यांचे प्रतिमेचे पुजन


मावळ- अयोध्या या ठिकाणी प्रभु श्री राम मंदिर भुमिपुजन  कार्यक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे शुभ हस्ते संपंन्न होत आसताना मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान श्री ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिर या ठिकाणी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे व माजी आमदार दिगंबर भेगडे ,तसेच मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर यांचे हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले,यावेळी मान्यवरांचे हस्ते आरती घेण्यात आली, तसेच प्रभू रामचंद्रांचा जय घोष करण्यात आला, उपस्थितांनी एकमेकांना लाडू भरऊन आनंद व्यक्त केला.
यावेळी हभप अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे  अध्यक्ष दत्ता महाराज शिंदे,अर्जुन फलके सुखदेव ठाकर,गणेश जांभळे,मावळ भाजपचे प्रभारी भास्कराव म्हाळसकर,नगराध्यक्ष मयुर ढोरे, कुंभार समाजाचे जिल्हा अध्यक्ष संतोष कुंभार,देवस्थान चे,उपाध्यक्ष गणेश ढोरे विश्वस्त,सचिव अनंता कुडे,सह सचिव किरण भिलारे,खजिनदार चंद्रकांत ढोरे, विश्वस्त  ,अँड अशोक ढमाले,अँड तुकाराम काटे,विश्वस्त अरुण चव्हाण,तुकाराम ढोरे,सुभाषराव जाधव ,सौ.सुनिता कुडे , आदींसह,पुजारी मयुर गुरव व पुरोहित सुशीलकुमार भिडे  उपस्तीत होते.

---------------------
---------------------
                 ------- × × × ------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या