Ticker

6/recent/ticker-posts

श्री पोटोबा देवस्थान, वडगाव यांचा दहावा वार्षिक अहवाल प्रकाशन सोहळा संपंन्न

मावळ-मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या वडगांव चे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थान यांचा दहावा वार्षिक अहवाल प्रकाशन सोहळा मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे,माजी आमदार दिगंबरशेठ भेगडे  व संप्रदाय क्षेत्रातील प्रमुख मंडळीनच्या उपस्थितीमध्ये संपंन्न झाला,
यावेळी मनोगतामध्ये खासदार आप्पा बारणे म्हणाले कि पोटोबा देवस्थान चे मावळ तालुक्यामध्ये उल्लेखनीय काम चालू आहे,लोकप्रतिनिधींपेक्षा आपले काम  हे समाजासाठी दिशा देणारे ठरत असते व त्या आधारावरच तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन समाजातील काही मंडळी काम करत असतात, ज्ञान,भक्ती  व शक्ती या  विचारांवर आपले काम  खऱ्या अर्थाने समाज घडवण्याचे कार्य करत आहे,,म्हणुनच आपले काम श्रेष्ठ आहे,
यावेळी हभप अखिल भारतीय वारकरी संप्रदाय मावळचे अध्यक्ष दत्ता महाराज शिंदे, हभप अर्जुन फलके, हभप सुखदेव ठाकर,हभप गणेश जांभळे, मावळ भाजपचे प्रभारी भास्कराव म्हाळसकर,नगराध्यक्ष मयुरजी ढोरे कुंभार समाजाचे जिल्हा अध्यक्ष संतोष कुंभार, देवस्थानचे उपाध्यक्ष गणेश अप्पा  ढोरे,  विश्वस्त सचिव अनंता कुडे, सह सचिव किरण भिलारे, खजिनदार चंद्रकांत ढोरे, विश्वस्त अॅड अशोक ढमाले,अॅड तुकाराम काटे, विश्वस्त अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, सौ.सुनिता कुडे आदीसह पुजारी मयुर गुरव व पुरोहित विश्वासराव भिडे   उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंता कुडे यांनी केले प्रस्थाविक मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर तर आभार विश्वस्त सुभाषराव जाधव यांनी मानले.
---------------------
---------------------
                 ------- × × × ------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या