Ticker

6/recent/ticker-posts

दूध दरवाढीच्या मागणीसाठी राज्यभर भाजपाचे महाएल्गार आंदोलन

मावळ - गाईच्या दुधाला प्रतिलिटर 30 रु  दर द्यावा तसेंच गाईच्या दुधाला प्रतिलिटर 10 रु अनुदान आणि दूध भुकटीकरीता प्रतिकिलो 50 रु अनुदान द्यावे या मागण्या शासनापुढे वारंवार मांडूनही शासनाने त्यावर अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यव्यापी महाएल्गार दुध संकलन बंद आंदोलन मावळ तालुक्यात नायगाव येथील पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या दूध संकलन केंद्रावर करण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष मा.श्री चंद्रकांतदादा पाटील, पश्चिम महाराष्ट्र भाजपचे संघटनमंत्री मा.श्री रविंद्र अनासपुरे, पुणे जिल्हा भाजप प्रभारी योगेश गोगावले, मा.राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे, पु.जि.मध्य.सह.बँक संचालक बाळासाहेब नेवाळे,  पुणे जिल्हा सरचिटणीस अविनाश बवरे, मा.सभापती गुलाबकाका म्हाळस्कर, भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्ष सायलीताई बोत्रे, जि.प.सदस्य नितीन मराठे, गणेश धानीवले, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, सरचिटणीस सुनील चव्हाण, मच्छिन्द्र केदारी, किरण राक्षे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे ,महा.प्रदेश भाजप युवा मोर्चा सचिव जितेंद्र बोत्रे,  लोणावळा नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, शामराव राक्षे, सुनील वरघडे, विकास लिंभोरे,  नामदेव वारींगे, रविंद्र विधाटे, सचिन भांडे,मोहन वाघमारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे व्यवस्थापकीय संचालक श्री.विवेक क्षीरसागर यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

---------------------
---------------------
                 ------- × × × ------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या