कामशेत:- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,कामशेत आणि जनकल्याण समिती,पुणे यांच्या माध्यमातून महर्षी कर्वे आश्रम शाळा,कामशेत येथे भारत मातेचे पुजन करुन सकाळी ९ ते ५ वाजे पर्यत कोरोना संबंधित सुरक्षेचे नियम पाळून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण 65 जणांनी रक्तदान केले. यावेळी महिला भगिनीनी ही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
सहभागी झालेल्या रक्तदात्यास प्रमाणपत्र,छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक तसेच आर्सेनिक एलब्म 30 गोळ्यां देण्यात आल्या.
0 टिप्पण्या