Ticker

6/recent/ticker-posts

कामशेत मधील हिंदुत्ववादी संघटनानी चीनने भारतीय सैनिकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ केला जाहीर निषेध

कामशेत -कामशेत मधील हिंदुत्ववादी संघटनानी भारत चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चीनी सैनिकांनी आंतरराष्ट्रीय करारांचे उल्लंघन करुन भारतीय सैनिकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज  चौकात जाहीर निषेध केला यात विश्व हिंदू परिषद बजरंगदल ,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.शहीद झालेल्या भारतीय जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन चीनी मालावर बहिष्कार करण्याचा संकल्प करण्यात आला.यावेळी शंकरभाऊ पिंगळे,सितेज जैन,अर्जुन शिंदे,उपसरपंच अभिमन्यु शिंदे,युवराज शिंदे,बिपीन बाफना,शंकरभाऊ गायकवाड ,सागर कटके,स्वामी गायकवाड ,दत्तामहाराज शिंदे,प्रसाद उंडे,आनंद शिंदे,सुभाष गदीया,बंटी शिनगारे,संकेत खांदवे, आदी स्वयंसेवक उपस्थित होते.

----------------------
----------------------
---------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या