कार्ला- महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचयात सरंपच व उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यास परवानगी दिल्याने मावळ तालुक्यातील पाटण बोरज ग्रुपग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बोरज येथील अंजली नवनाथ कडू यांची गुप्त मतदानाद्वारे उपसरपंचपदी निवड झाली.
उपसरपंच लक्ष्मण सणस यांनी आपल्या उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने सरपंच रुपाली पटेकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचयातीत उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली.यावेळी निर्धारित वेळेत अंजली कडू व संतोष केदारी यांचा अर्ज आला व शेवटी गुप्त मतदान पध्दतीने मतदान झाल्यावर अंजली कडू यांना सहा तर संतोष केदारी यांना दोन मते पडली तर एक मत बाद झाले.व अंजली कडू यांची सरंपच पटेकर व ग्रामसेवक नासीर पठाण यांनी उपसरपंचपदी निवड जाहीर केली.
पाटण व बोरज ग्रुपग्रामपंचायत असल्याने बोरजला प्रथमच चाळीस वर्षांनंतर महिला* उपसरपंचपदाचा मान मिळाला आहे.
यावेळी उपसरपंचपदी अंजली नवनाथ कडू यांची निवड झाल्यानंतर ग्रामपंचयात कार्यालयत माजी उपसरपंच संदिप तिकोणे,माजी उपसरपंच सुरेखा तिकोणे,सुनंदा तिकोणे,अश्विनी तिकोणे,लक्ष्मण सणस,सदस्या सुजाता नाचन यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
यावेळी पुणे जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे,भाजपा प्रदेश सरचिटणीस जितेंद्र बोत्रे,मावळ तालुका युवामोर्चा कार्यअध्यक्ष अर्जून पाठारे,भाजपा उपाध्यक्ष मच्छिंद्र केदारी,कृष्णा घिसरे,प्रदिप हुलावळे,नारायण तिकोणे,रघूनाथ तिकोणे,बाळू तिकोणे,संदिप रा तिकोणे,काळुराम तिकोणे,पंढरीनाथ तिकोणे,काळूराम सणस,श्रीकांत शिळवणे,अंकुश तिकोणे,विजय तिकोणे,प्रविण तिकोणे,गणेश तिकोणे,पंकज तिकोणे,कांतीलाल कडू,भागूजी केदारी,शशिकांत नाचन,तुकाराम कडू,शंकर केदारी,ज्ञानेश्वर केदारी,सुरेश केदारी यांच्यासह पाटण बोरज गावातील ग्रामस्तथांनी कडू यांची उपसरपंचपदी निवडझाल्याबद्दल अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.


0 टिप्पण्या